गुन्ह्यातील ३० तोळे सोने जप्त…
पुणे (प्रतिनिधी) : प्रतिनिधी वाहनचालक म्हणून काम मारणाऱ्या व्यक्तिनेच भावाच्या मदतीने मालकाचे घर फोडून ३२ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पावणे दहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन महिन्यांपूर्वी खडीमशिन चौकात हा घरफोडीचा गुन्हा घडला होता.
कोंढवा पोलिसानी गुन्हा उघडकीस आणून कर्नाटक राज्यात मूळगावी पळून गेलेला वाहनचालकास अटक केली आहे. प्रवीण चंद्रकांत गायकवाड (सध्या रा. किरकिटवाडी पुणे, मूळ रा. बलुर्गी,तालुका अफजलपुर, जिल्हा गुलबर्गा, राज्य कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय २८ वर्ष, रा.बलुर्गी. तालुका -अफजलपुर, जिल्हा- गुलबर्गा, राज्य कर्नाटक) या दोघांविरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी संदीप बधे (रा.खडीमशीन चौक,कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.