भोसरीत मोबाईलचे दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी – मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून 45 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शरयू इंटरप्रायजेस भोसरी येथे रविवारी (दि. 16) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. विशाल प्रकाश पाटील (वय-23, रा. पसायदान सोसायटी, परांदे नगर, दिघी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल यांचे भोसरी येथे शरयू इंटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास विशाल यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले. दुकानात ठेवलेले ओपो कंपनीचे 13 मोबाईल फोन, सॅमसंग कंपनीचे 13 मोबाईल फोन, विवो कंपनीचे 8 मोबाईल फोन, रेडमी कंपनीचे 3 मोबाईल फोन, लावा, टॅम्बो, जिओ कंपनीचे 7 आणि विशाल यांचा वयक्तिक वापराचा ओपोएफ कंपनीचा एक मोबाईल फोन आणि 8 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 67 हजार 210 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)