वाहन चोरीचे ‘शतक’ करणारे सराईत जेरबंद

वाकड : सराईत वाहन चोरांसह वाकड पोलीस.

गाड्यांना “जीपीएस’ असूनही गुंगारा : वाकड पोलिसांची कामगिरी

वाहन चोरीसाठी क्रेनचीही चोरी

राजू जावळकर याने आत्त पर्यत कार, टेम्पो, क्रेन अशा एक नव्हे तर 100 गाड्या चोरल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्याच्याकडे एक क्रेन आहे. ती देखील चोरीची असल्याचे तपासात समोर आले आहे. गाडीतील “जीपीएस’च्या आधारे पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी तो चोरीची गाडी निर्जनस्थळी येथे नेत असे तेथे चोरीच्या वाहनाचे सर्व भाग कटरने कापून ते भंगारात विकत असे. आत्तापर्यंत त्याने पुणे, अहमदनगर, सातारा येथून 100 चारचाकी चोरल्या. त्याच्यावर शंभर तर त्याचा साथीदार सोमनाथ चौधरी याच्यावर 25 गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी  – चोरी करण्यासाठी जेवढी शक्कल लढवावी लागते. तेवढीच ती लपवण्यासाठी सुद्धा करावी लागते. वाकड पोलिसांनी अशाच दोन अट्टल वाहन चोरांना पकडले. त्याने “जीपीएस’ असलेल्या शंभर गाड्या चोरुन पोलिसांना गुंगारा दिला होता. राजु बाबुराव जावळकर (वय-50, रा. कोल्हेवाडी, पुणे) व त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी (वय-32, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाणे हद्दीत एक छोटा टेम्पो चोरीला गेल्याची तक्रार दाखल कऱण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यानुसार तो टेम्पो खेड, शिवापूर येथे असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस खेड शिवापूर येथे पोहचले असता त्यांना आरोपी हे एका टेम्पोला गॅस कटरने कट करून क्रेन लावून उचलून घेऊन जात असल्याचे दिसले. यावेळी पोलिसांनी संबंधीत गाडीसंबंधी व त्याच्या कागदपत्रांविषयी विचारले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता टेम्पो चोरीचा असल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून टाटा क्रेन, टेम्पो व गॅस कटर असा 3 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

त्यांच्यावरील वाकड, इंदापूर, चिखली, चाकण, तळेगाव व कऱ्हाड येथील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, सहायक पोलीस निरीक्षक एन. डी. सस्ते, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी देवीदास शेळके, डी. डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, दीपक भोसले, भैरोबा यादव, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, शाम बाबा, मधुकर चव्हाण, विक्रांत चव्हाण यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)