निगडीत जमिनीचा जबरदस्ती ताबा घेणाऱ्या दोघांवर गुन्हा

पिंपरी – जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्याचा प्रयत्न करून दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 14) रात्री साडेदहाच्या सुमारास या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी विलास पंढरीनाथ कुटे (वय- 52, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मनोज बोरसे यांच्यासह एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच कुटे व त्यांच्या पत्नीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)