पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास

पिंपरी – नातेवाईकाकडे जात असणाऱ्या पादचारी महिलेचे मंगळसूत्र चोट्यांनी लंपास केले. बुधवारी (दि.12) दुपारी दीडच्या सुमारास बावधन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी रेखा संदीप तांगडे (वय 30, रा. भूगाव माताळवाडी, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांगडे या बुधवारी दुपारी त्यांच्या एका नातलगाच्या घरी पायी जात होत्या. दरम्यान बावधन मर्चंट पतपेढीच्या गेटजवळ आल्या असता पल्सर दुचाकीवर दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. त्यांच्या गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)