पिंपळे निलख येथे सोनसाखळी हिसकावली 

पिंपरी -रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना पिंपळे निलख येथे मंगळवारी सायंकाळी घडली. कमल नामदेव ढवळे (वय-68, रा. सह्याद्री बंगला, जगताप डेअरी, विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास कमल या रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 28 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)