पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेकनजीकच्या वडारवस्ती येथील घटना : मुलांनी दिली घटनेची माहिती

कर्जत – झोपलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर व गळ्यावर लोखंडी वस्तूने वार करून पतीने खून केला. त्यानंतर पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेकनजीकच्या वडारवस्ती येथे सोमवारी (दि.3) पहाटे घडली.

उज्ज्वला रमेश शिंदे (वय-35) असे मृत महिलेचे नाव आहे. रमेश गणपत शिंदे (वय-40) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शिंदे याने पत्नीचा खून केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्‍यातील लिंपणगाव येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी शिंदे याने मुलांनाही बरोबर घेतले होते. मात्र ते अर्ध्या रस्त्यातूनच परत आले. त्यामुळे ते बचावले.
या हत्येचे कारण मात्र समजलेले नाही. कर्जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कर्जतच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. सोमवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शेतमजूर असलेल्या रमेश शिंदे याने सोमवारी पहाटे झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर लोखंडी वस्तूने वार केले. तसेच डोक्‍यात दगडाने अनेक वेळा घाव घातले. त्यानंतर शिंदे यांने अंगणात झोपलेल्या दोन मुलांना घेऊन सिध्दटेकच्या दिशेने पळून गेले. दरम्यान सिध्दटेक येथे गेल्यानंतर त्यांनी मी लघुशंका करून येतो, तुम्ही दोघे येथेच थांबा, असे मुलांना सांगीतले. मात्र यावेळी मुलांनी पळ काढून आरोपी रमेशचा चुलतभाऊ सुभाष शिंदे याचे घर गाठले. मुलांनीच या घटनेची माहिती त्यांना दिली. ते सर्वजण घरी आल्यानंतर सर्व घटना उघडकीस आली.

कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण घटनास्थळी आल्यानंतर पंचनाम्यादरम्यान रमेशचा मोठा मुलगा अनिकेत (वय 16) व संदेश शिंदे (वय 14) यांनी सर्व हकीगत सांगितली. मात्र घटनेचे नेमके कारण त्यांनाही समजले नाही.

दरम्यान, रमेश शिंदेचे वडील, भाऊ व भावजय यांना बोलता येत नसल्याने काही समजू शकले नाही. त्यानंतर उज्ज्वलाच्या माहेरकडील व्यक्तींना बोलावण्यात आले. याबाबत शांतिलाल मारुती आगवणे (वय-65, रा. जळोची, ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत मयत उज्वला ही भोळसर असून, स्वयंपाक व घर नीटनेटके ठेवता येत नसल्याने तिला पतीने मारले असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)