खोट्या धनादेशप्रकरणी साडेसहा लाखांसह कैदेची शिक्षा

कोपरगाव – सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास ऊसपुरवठा करणाऱ्या अमृत संजीवनी शुगरकेन कंपनीस खोटा धनादेश दिल्याप्रकरणी उत्तम भिवा चव्हाण यांना साडेसहा लाख रुपये नुकसान भरपाई व सहा महिने कैदेची शिक्षा ठोठावली आहे, अशी माहिती ऍड. अशोकराव टुपके यांनी दिली.

ऊसवाहतूक करणाऱ्या अमृत संजीवनीकडून आरोपी उत्तम भिवा चव्हाण (गव्हाळी तांडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी उचल रक्कम घेतली. मात्र या रकमेची परतफेड केली नाही. तसेच दिलेला धनादेश खोटा निघाला. या प्रकरणी अमृत संजीवनीचे विजय नरोडे यांनी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी कोपरगावचे न्यायदंडाधिकारी पी. एन. देशपांडे यांच्या समोर झाली. त्यात त्यांनी आरोपीस साडेसहा लाख रुपये नुकसानभरपाई व सहा महिने कैदेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे ऊसतोडणी कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरोपी चव्हाण यांनी साडेसहा लाख रुपये नुकसानभरपाईची रक्कम वेळेत भरली नाही, तर त्यांना पुन्हा एक महिना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अमृत संजीवनीच्यावतीने ऍड. अशोकराव टुपके यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)