मारहाण करून 25 हजाराचा मुद्देमाल लंपास

नेवासे – कुकाण्यातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या तरुणाने, दोघांना दारू पाजण्यास नकार दिल्याने, लोखंडी गजाने मारहाण करीत खिश्‍यातील 20 हजार रुपये रोख व मोबाईल असा पंचवीस हजारांचा ऐवज जबरदस्तीने चारून नेल्याने परिसरात खळबळ उडाली.

याबाबत जब्बार निजाम इनामदार (वय-41), (रा. कुकाणे) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री 8 वाजता मी व माझा मित्र मच्छिंद्र जाधव हॉटेलवरजेवण करीत असताना, राजू घिसाडी व अक्षय गोर्डे ( रा. कुकाणे) या दोघांनी आम्हाला दारू पाज व तुझ्याकडील कापसाचे पैसे काढ, असे धमकावले. त्यांना दारू पाजण्यास व पैसे देण्यास नकार दिला असता, राजू घिसाडी याने लोखंडी गज डोक्‍यात मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मी मध्ये हात घातल्याने हाताला मार लागला.

-Ads-

त्यानंतर दोघांनी मारहाण करून राजू याने जबरदस्तीने माझे खिश्‍यातील कापसाचे 20 हजार रुपये व अक्षय याने पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी तेथुन पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)