नागापूर येथील दोन घरफोडीत कुबड्याला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 41 हजारांचा मुद्देमाल जप्त

कुबड्याकडील मोबाईलमुळे गुन्ह्याची उकल

किरण पालवे ऊर्फ कुबड्या हा परिसरात वावरत असताना तो चार मोबाईल घेऊन फिरत होता. हे मोबाईल काहीसे महागडे होते. त्याची परिस्थिती पाहता त्याला मोबाईल घेणे शक्‍य नव्हते. तरी देखील तो महागडे चार मोबाईल घेऊन फिरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचाली देखील संशयास्पद होत्या. पोलिसांच्या खबऱ्याने हे हेरले आणि त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेपर्यंत पोच केली. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यानुसार माग काढला आणि कुबड्या फसला!

नगर  – नागापूर येथील दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. किरण दशरथ भोसले ऊर्फ कुबड्या (वय 19, रा. दावलमालिक चौक, रा. नागापूर) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील 39 हजार रुपयांचे चार मोबाईल व दोन हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 41 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कुबड्याला अटक होताच त्याचा साथीदार पसार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

कुबेर प्रेमप्रकाश बिंदबेश्वर (रा. आदर्शनगर) येथे 24 जुलैला घरात चोरी झाली होती. चोरांनी घरातून 27 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती, की या चोरीमागे कुबड्या आहे. पवार यांनी त्यानुसार चौकशी सुरू केली आणि त्यात तथ्य आढळले. कुबड्या याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने ही चोरी साथीदार गणेश कुऱ्हाडे (रा. बोल्हेगाव) याच्या मदतीने केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानुसार गणेश याचा शोध सुरू केला. परंतु कुबड्याला अटक होताच तो पसार झाला आहे.

दरम्यान, कुबड्याने नागापूर येथे आणखी एका ठिकाणी चोरी केल्याची माहिती दिली. पितळे कॉलनी येथील अंकुश चंद्रकांत नरवडे यांच्या घरी 15 नोव्हेंबरला चोरी केली होती. ही चोरी करताना गणेश देखील त्याच्याबरोबर होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या चोरीचा देखील गुन्हा दाखल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)