पर्स हॉटेलमध्ये विसरताच त्यातील ऐवजावर डल्ला

नगर – प्रवासी ग्राहकाची हॉटेलमध्ये पर्स विसरलेल्याचा फायदा चोरांनी घेतला आणि त्यातून 1 लाख 2 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरांनी लांबविला. जेऊर (ता. नगर) शिवारातील हॉटेल राधाईमध्ये ही घटना घडली. स्वप्नील शेळके (रा. अमरावती) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

स्वप्नील शेळके हे चहा पिण्यासाठी हॉटेल राधाईमध्ये थांबले होते. हॉटेलमधील टेबलाजवळ त्यांची पर्स विसरून राहिली. चोरांनी त्याचा फायदा घेत त्या पर्समधील दागिने व रोख रक्कम काढून घेतली.

-Ads-

सुमारे 1 लाख 2 हजार 500 रुपयांचा हा ऐवज होता. स्वप्नील शेळके यांना पर्स हॉटेलमध्ये विसरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तिथे धाव घेतली. त्यावेळी पर्समधून ऐवजाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)