मारहाणीत अमलगीरचा एक जण जखमी

भिंगार कॅम्पला सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद

भिंगार – अलमगीरमध्ये किरकोळ कारणावरून एकाला सात जणांनी लाकडी दांडके आणि फायटरने मारहाण केली. मतीन शब्बीर खान (रा. अलमगीर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सोहेल अन्सार मोमीन, आबीद ईस्माईल शेख, अब्रार फारूक सय्यद ऊर्फ अबू, शहादाब शानू सय्यद, मुजामील कादीर शेख ऊर्फ भैय्या, मोबीज शेख (पूर्ण नाव समजलेले नाही), जुबेर रुस्तूब खान (सर्व रा. अमलगीर, नागरदेवळे, ता. नगर) या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-

मतीन खान यांच्या येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नाचताना धक्का लागण्याच्या कारणावरून भांडणे झाली. ही भांडणे तिथे मिटली. परंतु मतीन खान हा दुचाकीवरून जात असताना त्याला रस्त्यावर वरील सात जणांनी अडविले. त्यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

लाकडी दांडके आणि फायटरने मारहाण केली. या मारहाणीत मतीन खान हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिंगार कॅम्प पोलिसांनी गैर कायद्याची मंडळी जमवून संगनमताने मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)