पिंपरी : छळ प्रकरणी चौघांवर गुन्हा

पिंपरी -घरगुती कारणावरुन महिलेचा छळ केल्याची घटना कासारवाडी येथील केशवनगर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अजरुद्दीन अब्दुल रहेमान (वय-30), अब्दुल रहेमान दाऊद शेख (वय-52), फरीदा अब्दुल रहेमान शेख, अरिफ रियाज शेख या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन घरगुती कारणावरुन फिर्यादी महिलेला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)