हॉटेल मालकाला नोकरांचा 10 लाखाचा गंडा

बिलांमध्ये फेरफार करून अपहार

पुणे – मगरपट्टा सिझन मॉल फुडकोर्टमधील “95 पास्ता व पिझ्झा’ या हॉटेल चालकास नोकरांनी 10 लाखाचा गंडा घातला आहे. हॉटेलच्या कॅश काऊंटरवर बिलिंगचे काम करणाऱ्या दोघांनी बिलांमध्ये फेरफार करून हा अपहार केला आहे. जुलै 2017 ते 11 नोव्हेंबर 2018 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

-Ads-

फिर्यादी ओमकार मुरकुटे (30, रा. मोझेअळी, लोहगाव) यांचे मगरपट्टा सिझन मॉलमध्ये “95 पास्ता व पिझ्झा’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी कॅश काऊंटरवर दोघांना दोन शिफ्टमध्ये कामाला ठेवले होते. या दोघांवरही विश्‍वासाने कॅश काऊंटरची जबाबदारी सोपवली होती. मागील दोन वर्षापासून दोघांकडून बिलात फेरफार करण्याचा प्रकार सुरू होता.

ग्राहकांना देण्यात आलेले बिल प्रत्यक्षात वेगळे असायचे आणि हॉटेलमध्ये जमा झालेली बिलाची रक्कम कमी असायची. मुरकुटे यांच्या लक्षात नुकताच हा प्रकार आला. यानंतर त्यांनी मागील दोन वर्षातील जमा खर्चाचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना तब्बल 10 लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक काळे करत आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, आरोपी शंकर हराळे (वय 23) आणि अविनाश गोंड (वय 25) हे दोघे कॅशिअर आणि मॅनेजर म्हणून काम पाहत होते. यातील हराळे हा मूळचा यवतमाळचा तर गोंड हा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. सध्या ते मुंढवा आणि मांजरी परिसरात राहत होते. ते अनेक वर्षापासून काम करत असल्याने मालकांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. मालकाला हाॅटेलमध्ये जमा होणाऱ्या पैशांमध्ये घोळ होत असल्याचे लक्षात येताच या दोघांनाही इतर कामगाराच्या मदतीने रंगेहाथ पकडण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)