पिंपरी -रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दोघांनी अडवून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार दि. 8 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. अमोल भाऊराव लांडगे (वय-27 रा. अशोकनगर, ताथवडे) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश शेळके, अक्षय नवले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ताथवडे येथील हॉटेल के.एम जवळील रस्त्याने पायी चालत जात होता. यावेळी आरोपींनी त्याला अडवले व विनाकारण हातावर, पाठीवर मारुन जखमी केले.