पिंपरी -दुचाकीवरुन चाललेल्या दोघांना तीन जणांच्या टोळक्यांनी अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावर दुचाकीस्वाराने “आमच्या कडे पैसे नाहीत’ असे म्हटल्यामुळे आरोपींनी त्याला दगडाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रहाटणी येथे घडली.
या प्रकरणी प्रदिप उध्दव निक्रड (वय 22, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक दशरथ बनसोडे संदेश उर्फ शिलव्या लाजरस चोपडे आणि आशिष एकनाथ शेटे (वय 19, रा. रहाटणी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.