पिंपरी -“ओएलएक्स’ या खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर ऍप्पल कंपनीचा लॅपटॉप विक्री करण्याच्या बहाण्याने अज्ञात मोबाईल धारकांने आपण सैन्यदलामध्ये असल्याचे खोटे सांगून तरुणाला तब्बल 1 लाख 69 हजार 119 रुपयांची फसवणूक केली.
ही घटना शुक्रवार दि. 7 जून रोजी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी महेश येडुला (वय 27, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7891032896 आणि 9672825256 या क्रमांकाच्या मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.