महिलेच्या गळ्यातील राणीहार हिसकावून चोरांचा पोबारा

संगमनेर – दुचाकीवरून पतीसोबत घराकडे चाललेल्या महिलेच्या गळ्यातील 75 हजाराचा राणीहार हिसकावून चोरांनी पोबारा केल्याची घटना संगमनेर तालुक्‍यातील मंगळापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

कांचन अनिल वाकचौरे ( रा. गणेश विहार, मालदाड रोड) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कांचन वाकचौरे पतीसोबत आपल्या घराकडे जात असताना मंगळापूर गावाजवळ पाठीमागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अज्ञात चोरांपैकी मागे बसलेल्या चोराने गळ्यातील चार तोळ्याचा अंदाजे 75 हजार रुपये किंमतीचा राणीहार हिसकावून नेला.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज निकम करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)