भाचीला सोने परत मागितले म्हणून विवाहितेचा छळ

पिंपरी – भाचीला दिलेले 40 तोळे सोने परत मागितल्याच्या कारणावरुन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना बावधन येथील शिंदेनगर येथे घडली.

याप्रकरणी 42 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पती अनिल काशीराम भोसले, ननंद सरिता चंद्रकांत साळवी रा. सुरत, तिचे पती चंद्रकांत साळवी, दुसरी ननंद निकीता नंदकिशोर सपकाळ रा.कोथरुड, तिचे पती नंदकिशोर सपकाळ, सासू आशा काशीराम भोसले, भाची गायत्री गणेश जाधव रा. विरार मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आरोपी गायत्री हिस दिलेले 40 तोळे सोन्याचे दागिने परत मागितले म्हणून आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिच्या सांगण्यावरुन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)