‘जाड’ असल्यामुळे जाच, विवाहतेची आत्महत्या

पिंपरी – “जाड’ असल्यामुळे सासरच्या लोकांकडून मिळणारे टोमणे आणि सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथे दि. 25 मे रोजी दुपारी पावणेदोन ते दोन वाजणेच्या सुमारास घडली.

प्रियंका केदार पेटकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुषकराज नंदकुमार प्रभुणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, तिचा पती केदार श्रीकांत पेटकर (वय-35), सुरेखा श्रीकांत पेटकर (वय-55), श्रीकांत विश्‍वनाथ पेटकर (वय-60 सर्व रा. बुरुड गल्ली, फलटण) व जगदीश माडीवाला रा. भोसरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांचा विवाह 20 डिसेंबर 2015 रोजी फलटण येथील केदार पटेकर यांच्यासोबत झाला होता. विवाह झाल्यापासून प्रियंका यांना तिचा पती केदार तसेच सासू-सासरे “तू जाड आहेस’ असे म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करत होते. तसेच जगदीश माडीवाला यांनी प्रियंका यांना “पैसे घेवून घटस्फोट घे’ असे म्हणून दबाव आणला.

सतत होणाऱ्या या त्रासाला कंटाळून प्रियंका यांनी दि. 25 मे रोजी त्यांची आई घराबाहेर गेल्यानंतर घरातील फॅनला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणात अरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए.एम सावर्डे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)