गॅस एजन्सीच्या कॅशिअरला लुटणाऱ्या चौघांना अटक

पिंपरी – गॅस एजन्सीची कॅश बॅंकेत भरण्यासाठी घेऊन जात असलेल्या कॅशिअरच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्यात आले होते. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दळवीनगर पुलावर घडली होती. पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने फिरवत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

जावेद इद्रीस शेख (वय-19), मोहम्मद मुर्तुझा आकसापुरे (वय-22), दिपक कालीदास तेलंग (वय-22), विजय लहु शिंदे (वय-19) अशी अटक केलेल्या चारही आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात सुहास पांडुरंग मोहिते (वय-40 रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुहास मोहिते हे भारत गॅस एजन्सी, काळेवाडी येथे कॅशिअर म्हणून नोकरीस आहेत. गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास सुहास गॅस एजन्सीमधील 2 लाख 56 हजार 457 रुपये एवढी रक्कम बॅगेत घेऊन बॅंकेत भरण्यासाठी जात होते. दरम्यान दळवीनगर येथील पुलाजवळ आल्यानंतर एका गरीब महिलेला दहा रुपये देण्यासाठी थांबले असता दुचाकीवरुन चार आरोपी आले. एकाने डोळ्यात मिरचीची पूड टाकली. दुसऱ्याने हातात कोयता घेऊन खाली पाडल, तिसऱ्याने ताब्यातील बॅग हिसकावून घेतली व पोबारा केला. सकाळी-सकाळी रहदारीच्या रस्त्यावर लूट झाल्याने खळबळ उडाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)