भिंगारमध्ये दोन गटात राडा

प्रातिनिधिक फोटो

भिंगार – लहान मुलांच्या भांडणावरून भिंगारमध्ये दोन गटात काठ्या, लोखंडी गज, दगड, लाथाबुक्‍यांनी 15 जणांमध्ये फ्रि-स्टाईल मारामारी झाली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात देखील या दोन्ही गटाने गोंधळ घातला. पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून 15 जणांविरोधात दंगा करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय धडसिंग यांच्या फिर्यादिवरून लालसाहेब गुलाब शेख, हुसेन गुलास शेख, जबीन लालासाहेब शेख, आफरीन हुसेन शेख, गुलाब बाबूलाल शेख, फजान अकील शेख आणि कमील शेख यांची पत्नी (सर्व रा. सदरबाजार) या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सात जणांनी संजय घडसिंग व त्यांची आई, मुलगा व पत्नी यांना काठ्या, गज व दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हसन गुलाब शेख यांच्या फिर्यादीवरून छाया घडसिंग, बाळू घडसिंग यांची पत्नी, सुनील घडसिंग यांची पत्नी, नाना घडसिंग, अमोल घडसिंग, बाळू घडसिंग (सर्व रा. कंजारवाडा) या आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हसन शेख व त्यांचा भाऊ, मुलगा व पुतण्या यांना दांडके व रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)