पिंपरी -जुन्या प्रेयसीने तिच्या पतीच्या सहाय्याने ब्लॅकमेलिग करुन मारहाण करत प्रियकराला लुटल्याचा प्रकार मुळशी येथे घडला आहे. ऋषिकेश विद्याधर काळभोर (वय-30 रा. लोणाकाळभोर) यांनी फिर्याद दिली असून प्रेयसी संध्या नाटक-मोडक व तिचा पती रोहित मोडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संध्या यांचे जुने प्रेमसंबंध होतो. याचाच गैरफायदा घेत फिर्यादीला मुळशी येथे बोलावून 17 एप्रिल रोजी बीअरच्या बाटली डोक्यात मारून मारहाण केली त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची साखळी व रोख 10 हजार 500 रुपये हिसकावून घेतले. त्यानंतरही 20 एप्रिलपर्यंत वारंवार फोन करुन 50 लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा फिर्यादीविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. यावरुन फिर्यादीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.