इमामपूरमध्ये विटांनी मारामारी

नगर – इमामपूर (ता. नगर) येथील शिवारात बहिरोबा मंदिराच्या पाठीमागील रोडवर म्हैस आल्याने झालेला अपघात समजावू सांगताना झाल्याच्या वादातून मारहाण होऊन दंगा झाला आहे.

बापू गोविंद आवारे (वय 65) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. भानुदास सहादू आवारे, नितीन भानुदास आवारे, बंटी भानुदास आवारे, संजय सोपान आवारे व चंद्रकला भानुदास आवारे (सर्व रा. इमामपूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपींनी फिर्यादी बापू यांना विटा आणि काठीने मारले आहे. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या मारमाऱ्यांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)