पिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार

पिंपरी – मिरवणुकीत नाचण्याच्या बहाण्याने बोलावून जुन्या भांडणाचा राग काढत तरुणावर वस्तऱ्याने वार करण्यात आले. हा प्रकार पिंपरी येथे रविवारी (दि.14) घडला.

अनिकेत बापू सरोदे (वय-23 रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून सचिन सुर्वे (वय-30 रा. पिंपरी) याच्या विरोधात मारहाण व दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत अनिकेत याला सचिनने नाचण्यासाठी म्हणून बोलावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र त्यांच्यातील जुन्या भांडणाचे कारण काढत त्याच्या मानेवर वस्तऱ्याने वार केले व लाथाबुक्‍यांनी मारहाण करुन त्याला जखमी केले. या भांडणात फिर्यादी यांचा फोनही गहाळ झाला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)