स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दोघांची लूट

श्रीगोंदा  – तालुक्‍यातील काष्टी शिवारात रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देतो, असे सांगून लुटण्यात आले. यावेळी संबंधित व्यक्तीकडील 70 हजार रुपये घेऊन आरोपी पळून गेले. हा प्रकार आज (दि.28) दुपारी चार वाजता घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे, मुन्ना व तीन स्त्रिया (नाव माहीत नाही) यांनी रायगड पनवेल तालुक्‍यातील खारघर (जि. रायगड) येथील खिझर अहमद व त्याचा मित्र शादाब पारकर या दोघांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून काष्टीत बोलावून घेतले. आज दुपारी चार वाजता एका मंदिर परिसरात बोलावून त्यांच्याकडील 70 हजार रुपये पळवून नेले. याबाबत खिझर अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खिझर अहमद व त्यांचा साथीदार पारकर हे दोघे नेहमी काष्टीच्या बाजारात बोकड खरेदीसाठी येतात. येथील शिंदे, मुन्ना व दोन स्त्रियांशी त्यांची ओळख झाली. या ओळखीच्या आधारे पंधरा दिवसांपूर्वी शिंदे नावाच्या व्यक्तीने अहमद व पारकर यांना संपर्क साधून माझ्याकडे सोने आहे. तुम्हाला स्वस्तात देतो, असे सांगून काष्टीच्या शिवारातील एका मंदिरा शेजारील शेतात पैसे घेऊन बोलावले. हे दोघे तेथे गेले असता, त्यांना बनावट सोने देऊन त्यांच्याकडील 70 हजार रुपये घेऊन पळ काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)