एकाच दिवशी फसवणूकीतचे तीन गुन्हे दाखल

पिंपरी – प्रत्येक आर्थिक व्यवहार करताना पूर्णपणे सावधानी बाळगणे, सर्व बाबींची खात्री करुन घेणे गरजेचे असते. अन्यथा घर खेरदी, ऑनलाईन शॉपिंग, व्यवसाय अशा अनेक व्यवहारांत फसवणूक केली जाऊ शकते. अशाच प्रकारे फसवूणक झालेल्या तीन घटना उघडकीस आल्या असून शहरात एकाच दिवशी फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात परस्पर दुकान विकून व्यावसायिकाची तब्बल 38 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली आहे.

सुभाष परगोंडा हुल्याळकर (वय-50 रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली असून हरी कंन्स्ट्रक्‍शनचे पार्टनर धर्मेश वाधवानी, नरेश वाधवानी, रुपाली रुग्वानी, विजय परमानंद मतनानी व इतर चार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे निलख येथे दोन दुकाने (क्रमांक 11 व 111) आहेत. आरोपींनी परस्पर संगनमत करत दुकान खरेदीचा बहाना करुन दुकान परस्पर दुसऱ्याला विकले व दुकानाचे कुलुप तोडून त्यातील ऐवजही चोरून नेला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत हिंजवडी येथे फसवून फ्लॅटचा सामानासहित ताबा घेतला आहे. या प्रकऱणी प्रतिभा प्रकाश सपकाळ (वय-56 रा.नेरुळ मुंबई) यांनी फिर्याद दिली असून वसंत दनार्दन आहेर, सविता वसंत आहेर (सर्व रा. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या दिवंगत पतीने फ्लॅट खरेदी केले होते. मात्र आरोपींनी परस्पर संगनमत करुन तीनही फ्लॅटचे कुलूप तोडून आतील सामानासह फ्लॅटचा ताबा घेतला आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तिसऱ्या घटनेत अंदमान येथे सहलीसाठी नेणार असल्याचे सांगून यात्रेकऱ्यांकडून पैसे घेतले मात्र ट्रिपचे बुकींग न करता कंपनीचे पैसे हडपले आहेत. यामध्ये यात्रेकरुंची 28 लाख 4 हजार 100 रुपयांची फसवणूक झाली आहे. संदीप वसंत राजपुरकर (रा. सरस्वती चाळ, दारुवाला ग्राउंड, मालाड, वेस्ट मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्याचे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सुरेश खोले (वय 45, रा. अनामिका बिल्डिंग, तानाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंदमान सहलीसाठी ग्राहकांकडून घेतलेली रक्कम राजपूरकर याने बॅंक खात्यात ट्रान्सफर करुन घेतली. पैसे घेऊनही बुकींग केले नाही. खोले यांनी आरोपीच्या खात्यात यात्रेचे नियोजन करता ट्रान्सफर केलेल्या 28 लाख 4 हजार 100 रुपयांचा अपहार केला. दरम्यान, ही रक्कम परत न करता तसेच बुकींग न करता आरोपीने फियार्दी व ग्राहकांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनीही नागरिकांना व्यवहार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)