पिंपरी – विनयभंग केल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून शंकर तुलसीराम विटकर (रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जिन्यावरून घरी जात असताना शंकर हे त्यांचा कुत्रा घेऊन उतरत होते. यावेळी फिर्यादी यांच्या हाताला शंकरच्या हाताचा स्पर्श झाला. यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पाहिले असता शंकर हा त्यांच्याकडे पाहून हसला यावरुन पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.