दारूच्या बाटल्या बाळगल्याने गुन्हा

file photo
 सातारा – जमा बंदी आदेश डावलत दारूच्या बाटल्या बाळगल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आंदोलनामुळे सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जमाबंदीचा आदेश दिला होता. तो आदेश डावलत ऋषी चंद्रकांत साळवी रा. शाहूनगर, गणेश साळवी, अभिजीत साबळे व इतर पाचजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील सर्वजण हे विसावा नाका परिसरात जमले होते. त्या परिसरात त्यांचा दंगा असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्यांकडून देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल धीरज कुंभार यांनी तक्रार दिली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)