डॉ. नवलेंसह 300 शेतकऱ्यांवर गुन्हा

जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरुद्ध विनापरवानगी काढला होता मोर्चा

नगर: भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह 300 जणांवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गैरकायद्याचा जमाव जमविल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी मनोज गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे.

पॉलीहाऊस व शेटनेट धारक शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी नगरमध्ये राज्यव्यापी परिषद झाली. या परिषदेनंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अचानक मोर्चा आणला. हा मोर्चा नियोजित नव्हता. त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबर महसूल प्रशासनाची धावपळ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. कोतवाली पोलीस अतिरीक्त बंदोबस्त घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. मोर्चाला नियंत्रीत केले. यावेळी मोर्चातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुंबई अधिनियमातील तरतुदींनुसार जिल्ह्यात जमावबंदीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. डॉ. अजित नवले यांच्यासह त्याच्याबरोबर असलेल्या सुमारे 300 शेतकऱ्यांनी या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गैरकायद्याची मंडळी जमविणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)