बांगलादेशचा क्रिकेटर ‘मशरफे मुर्तझा’ झाला खासदार

ढाका – बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मशरफे मुर्तजा यांच्या राजकीय कारकिर्दीची शानदार सुरूवात झाली आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या खासदारकीची निवडणूक मुर्तझानं जिंकली आहे.

बांगलदेशच्या माध्यमानुसार नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुर्तझानं अवामी लीग पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. या निवडणूकीत मुर्तझा अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाला आहे. मुर्तझांला निवडणुकीत 2 लाख 74 हजार 418 मतं मिळाली तर पराभुत उमेदवाराला फक्त 8 हजार 6 मंत मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांगलादेशमधील निवडणूकांमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगनं जोरदार विजय संपादन केला. अवामी लीगचा पक्ष 300 पैकी 260 ठिकाणी विजयी झाला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज विरूध्दच्या एकदिवसीय मालिकेत मुर्तझाच्या नेतृत्वात बांगलादेशनं वेस्ट इंडिजला 2-1 ने हरवलं होते. तर कसोटी मालिकासुध्दा 2-0 ने आपल्या नावे केली होती. मशरफे मुर्तझा याने बांगलादेश संघासाठी आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 202 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने एकूण 1728 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत एकूण 258 विकेटस घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)