पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाची परतफेड करण्यास भारतीय महिला सज्ज

गयाना – महिला टी- 20 विश्‍वचषक स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात आज भारतीय संघाची लढत पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होणार असून पहिल्या सामन्यातील भारतीय महिलांची कामगिरी पाहता या स्पर्धेतील दुसऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांच्याकडे विजयाचे दावेदार म्हणून पहिले जात आहे.

पहिल्या सामन्यात न्युझिलंड सारख्या मातब्बर संघाला पराभूत करून भारतीय महिला संघाने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ऐतिहासिक शतकी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा दुसरा सामना पाकिस्तान संघाशी रविवारी होणार आहे. 2016 मध्ये भारतात झालेल्या महिला टी -20 विश्‍वचषकात भारतीय महिलांना पाकिस्तान महिला संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. परंतु, त्यानंतर झालेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने आपला पहिला सामना 34 धावांनी जिंकला. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचे आत्मबल जास्त असेल. भारताची विजयी लय ही भारतासाठी जमेची बाजू ठरू शकते.

न्युझिलंड विरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधार हरमनप्रीतने स्फोटक शतक ठोकले होते. त्याचबरोबर मधल्याफळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्झने 59 धावांची जबाबदार खेळी केली होती. त्यामुळे मिताली राजला फलंदाजीस उतरण्याची गरज भासली नाही. पुढील सामन्यात देखील तिच्याकडून अश्‍याच जबाबदार खेळीचे अपेक्षा असणार आहे.

गयाना येथील प्रॉव्हिडन्सची खेलपट्टी ही धिमी असल्याने फलंदाजांसाठी ती नंदनवन ठरणार असल्याने भारतीय संघातील फलंदाजांसाठी ती फायदेशिर ठरू शकेल. त्यातच भारतीय संघ गत सामन्यात चार प्रभावी फिरकी गोलंदाजांसह उतरला होता. तेच फिरकी गोलंदाज या सामन्यात पुन्हा एकदा संघात समाविष्ट केले जाण्याची शक्‍यता आहे.

यावेळी ऑफ स्पिनची जबाबदारी ही दीप्ती शर्मा आणि दयालन हेमलथा यांच्याकडे आहे तर लेग स्पिनर पूनम यादव आणि लेफ्ट आर्म राधा यादव या देखील बळी मिळवण्यात सक्षम आहेत. न्यूझीलॅंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय स्पिनर्सनी आठ बळी मिळवले होते. त्यामुळे पुढील सामन्यात देखील ते महत्त्वाची भूमिका बजावू शकता. या सामन्यात लयीत असणाऱ्या भारतीय महिलांचा संघ विजयी कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)