वेस्ट इंडिजने केले इंग्लंडला पराभूत

ब्रिजटाऊन  – शेमरॉन हेतमायरचे नाबाद शतक आणि वेस्ट इंडीजच्या संघात पुनरागमन करताना शेल्डन कॉट्रेल याने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लडला 26 धावांनी पराभूत करत पाच सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यांत धावांचा विक्रमी पाठलाग करण्याची किमया साधणाऱ्या इंग्लडच्या संघाला 290 धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. त्यांचा संघ सर्वबाद 263 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांचे अखेरचे 6 फलंदाज 35 धावात गारद झाले.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 50 षटकांत 289 धावा केल्या होत्या. त्यात हेतमायर याने नाबाद 104 धावा केल्या. तर ख्रिस गेलं ने 50 धावांचे योगदान दिले. 40 षटकापर्यंत इंग्लडने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवताना 4 बाद 228 धावांपर्यंत रोखले होते. त्यानंतर हेतमायरने आक्रमक शतक झळकाविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्युत्तरात 290 धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीस आलेल्या इंग्लडची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर संघाची धावसंख्या 10 असताना माघारी परतले होते. त्यानंतर इंग्लडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने 70 आणि बेन स्टोक्‍स 79 धावा करत इंग्लंडचा डाव सावरला; परंतु हे दोघे बाद झाल्यावर इंग्लडचा डाव गडगडला आणि त्यांना पराभूत व्हावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)