विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटला संजीवनी दिली : ग्रॅमी स्मिथ

कोलकाता  – गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद या मुद्‌द्‌यावरुन अनेक चर्चा होत आहे, त्यामुळे कसोती क्रिकेट मध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. त्यातच, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याच्या मते, विराट कोहली कसोटी क्रिकेट जिवंत ठेऊ शकतो.

ज्याप्रमाणे विराट कसोटी क्रिकेट मध्ये फलंदाजी करतो ते पहाता त्याने क्रिकेटच्या या स्वरूपाला संजीवनीच दिली आहे असे मतही त्याने प्रकट केले आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ झालेल्या वार्षिक कार्यक्रमात त्याने व्याख्यान दिले. त्यावेळी त्याने भारतीय संघातील नवोदित खेळाडूंचेही त्याने यावेळी कौतुक केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगमोहन दालमिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात स्मिथने दक्षिण आफ्रिका संघ आंतरराष्ट्रीय स्तरावार परतण्यासाठी दालमिया यांनी मदत केल्याचे सांगितले. तसेच तो म्हणाला “आमच्यासाठी बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्तारावर पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणे ही खूप मोठी गोष्ट होती. मी त्यावेळी फक्त 12 वर्षांचा होतो. क्‍लाईव्ह राईस यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मी ईडन गार्डनवर उतरताना पाहिले होते.’ स्मिथने त्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळायला मिळाणे हे भाग्याचे असल्याचेही मत त्याने यावेळी मत व्यक्त केले.

स्मिथने सध्याच्या भारतीय संघात असलेल्या युवा खेळाडूंची स्तुती केली. तो म्हणाला भारताने जागतिक क्रिकेटला काही गुणवाण खेळाडू दिले आहेत. पंत त्यांच्यापैकी एक आहे. भारतात गुणवान खेळाडू तयार होण्यात येथील रणजी ट्रॉफी, आयपीएल सारख्या स्थानिक स्पर्धांचे मोठे योगदान आहे. याच बरोबर त्याने ज्युनिअर संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचेही ज्युनिअर मुलांचे भविष्य घडवण्यात योगदान दिल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी बोलताना स्मिथ म्हणाला की, कसोटी क्रिकेटसाठी विराट सारख्या सुपरस्टार खेळाडूंची गरज आहे. त्यांच्यामुळे कसोटी क्रिकेट जिवंत आहे. तो जोपर्यत विराट कसोती खेळत आहे तोपर्यंत कसोटी क्रिकेट जिवंत राहण्याची आशा आहे. कसोटी क्रिकेटसाठी बोरिंग ड्रॉ घातक आहेत. कसोटीत बॉल स्विंग व्हायला हवा, स्पिन व्हायला हवा. तरच कसोटी क्रिकेट जिवंत राहील. असेही मत स्मिथने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)