एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट स्पर्धा :
पुणे – ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एसएसजी संघाचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ऋषी राऊतच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एसएसजी संघाचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना पराग सराफ व विराज काकडे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एसएसजी संघ 19.5 षटकात सर्वबाद 104 धावांत गारद झाला.
104 धावांचे लक्ष ऋषी राऊतच्या नाबाद 53 धावांसह सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने केवळ 15.3 षटकात 5 बाद 107 धावा करून सहज पुर्ण करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. ऋषी राऊत सामनावीर ठरला. दुसऱ्या लढतीत इर्शाद बेगच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर नॉर्थन ट्रस्ट संघाने पुणे ड्रिम्स संघाचा 112 धावांनी दणदणीत पराभव केला.