प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा : सिमन्स-टीसीएसमध्ये अंतिम लढत

पुणे – सिमन्स आणि टीसीएस यांच्यात प्रथम स्पोर्टस आयोजित प्रथम व्हिन्टेज कप आय-टी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत सिमन्स संघाने एफआयएस ग्लोबल संघावर, तर टीसीएस संघाने स्प्रिंगर नेचर संघावर मात केली.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत सिमन्स संघाने एफआयएस ग्लोबल संघावर 22 धावांनी मात केली. ग्लोबल संघाने सिमन्स संघाला निर्धारित 20 षटकांत 157 धावांत रोखण्यात यश मिळवले. ग्लोबलकडून प्रशांत पोळने पाच, तर गिरीश खडसेने चार गडी बाद केले. यात सौम्या मोहंतीने 22 चेंडूंत 4 चौकारांसह 34, तर अतुल पवारने 24 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारसह 33 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ग्लोबल संघाला 9 बाद 135 धावाच करता आल्या. ग्लोबलच्या फलंदाजांनी सिमन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. ग्लोबलकडून रोहित भटालियाने एका बाजूने किल्ला लढविला. त्याने 36 चेंडूंत 6 चौकारांसह सर्वाधिक 47 धावा केल्या.

दुसऱ्या लढतीत टीसीएस संघाने स्प्रिंगर नेचर संघावर 75 धावांनी मात केली. टीसीएस संघाने 8 बाद 156 धावा केल्या. यात विक्रमजितसिंगने 63 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकारसह 91 धावा केल्या. यानंतर टीसीएस संघाने स्प्रिंगर नेचरचा डाव 14.5 षटकांत 81 धावांत गुंडाळला. यात अभिनव कालियाने 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

1) सिमन्स – 20 षटकांत सर्वबाद 157 (सौम्या मोहंती 34, अतुल पवार 33, हिमांशू अगरवाल 20, प्रशांत पोळ 5-29, गिरीश खडसे 4-35) वि. वि. एफआयएस ग्लोबल – 20 षटकांत 9 बाद 135 (रोहित भटालिया 47, सूरज दुबळ 19, प्रशांत पोळ 19, मनोज भागवत 3-22, दीपककुमार 2-14).

2) टीसीएस – 20 षटकांत 8 बाद 156 (विक्रमजितसिंग 91, गौरवसिंग 28, अमित उपाध्यय 2-24, विशाल होळ 1-18) वि. वि. स्प्रिंगर नेचर – 14.5 षटकांत सर्वबाद 81 (अविनाश अम्बळे नाबाद 22, राजीव सगेखर 16, अभिनव कालिया 4-16, मयंक जसोरे 2-17, तेजपालसिंग 2-10).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)