संघ निवडीसाठी यो-यो टेस्ट हाच निकष नसावा : मोहम्मद कैफ

भुवनेश्वर – भारताचा माजी फलंदाज मोहंमद कैफयाने संघनिवडीसाठी यो-यो टेस्ट हा एकमेव निकष नसावा असे म्हणताना यो-यो टेस्तच्या बाबतीत महत्वपूर्न विधान केले आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की, यो-यो टेस्टच्या सोबतच खेळाडूची कामगिरी आणि त्याची क्षमता अश्‍या अन्य बाबींना देखील यो-यो टेस्ट इअतकेच महत्व दिले पाहिजे.

भुवनेश्‍वर येथे एका कर्यक्रमासाठी आला असताना बोलताना त्याने सांगितले की, क्रिकेटसारख्या खेळात फिटनेस महत्वाची असते. मात्र, फिटनेस हा एकच निकश न ठेवता संघनिवडीसाठी सामान पर्यायी निकषांचा विचार देखील केला जावा असेही त्याने यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ व्यवस्थापनाने संघ निवडताना खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीला खूप महत्व दिले आहे. त्यासाठी खेळाडूंनी योयो टेस्ट किमान 16.1 गुणांसह पार करणे गरजेचे आहे. जर एखादा खेळाडू असे करण्यात अपयशी ठरला तर त्याचा संघनिवडीमध्ये विचार केला जात नाही. नजिकच्या काळात याचा फटका सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांना बसला होता. त्यामुळे या टेस्टवर अनेकांनी टिका केली होती.

यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की, मी ज्यावेळी भारतीय संघाकडून खेळत होतो. त्यावेळी, आमच्या साठी बीप टेस्ट ही फिटनेस टेस्ट केली जायची. मात्र, या टेस्टमुळे कोणत्याही खेळाडूला त्याची संघातील जागा गमवावी लागली नव्हती असेही त्याने यावेळी नमूद केले आहे.

कारण जर एखादा खेळाडू सातत्याने धावा करतोय किंवा बळी मिलवतोय मात्र तो त्या टेस्त मध्ये नापास झाला म्हणुन तुम्ही त्या खेळाडूला संघातून बाहेरचा रस्ता तर दाखवू शकत नाही. याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर आणि त्याच्या करीअर वर होउ शकते. हेही त्याने यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)