सनगार्ड, यार्डी संघांचे विजय

प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – सनगार्ड, यार्डी सॉफ्टवेअर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत येथे सुरु असलेल्या प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढती मधिल पहिल्या लढतीत सनगार्ड संघाने कॉग्निझंट संघावर 14 धावांनी मात केली. यात सनगार्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 154 धावा केल्या. यात कौस्तुभ बाकरेने 33 चेंडूंत 3 षटकार व 1 चौकारसह सर्वाधिक 45 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कॉग्निझंट संघाला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 140 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 14 धावांनी पराभूत व्हावे लागले.

तर, दुसऱ्या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने मर्स्क संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. मर्स्क संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 151 धावा केल्या. यात वैभव महाडिकने 44 चेंडूंत 8 चौकारांसह 59 धावा केल्या. यानंतर यार्डी संघाने विजयी लक्ष्य 19.4 षटकांत 4 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात स्वप्नील घाटगेने 32 चेंडूंत 7 चौकार व 7 षटकारांसह 53, तर अमित राडकरने 37 चेंडूंत 5 चौकारांसह 40 धावा केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)