व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची आगेकुच

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी च्या संघाने कॅडेन्स अकादमी संघाचा एकतर्फी पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतविजयी आगेकुच नोंदवली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅडेन्स अकादमीच्या संघाला 28.1 षटकांत सर्वबाद 122 धावांचीचे मजल मारता आल्याने वेंगसकर ऍकॅडमी समोर विजयासाठी 123 धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरात खेळताना वेंगसकर अकादमीने हे आव्हान 27.5 षतके आणि तीन गडी गमावून पूर्ण करत सामन्यात विजय नोंदविला.

नेहरू स्टेडीयम येथे झालेल्या या सामन्यात साखळी फेरीत ओंकार राजपुतच्या अफलातून अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने कॅडेन्स अकादमी संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओंकार राजपुत व सक्षम काडलक यांच्या अचूक गोलंदाजीपुढे कॅडेन्स अकादमी संघ केवळ 28.1 षटकांत सर्वबाद 122 धावांमध्येच गारद झाला. यावेळी वेदांत जगदाळेने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.

ओंकार राजपुतने 20 धावांमध्ये 4 गडी बाद केले तर सक्षम काडलकने 35 धावांत 3 गडी बाद करत त्याला सुरेख साथ देत कॅडेन्स अकादमी संघाचा धुव्वा उडवीला. तर, भार्गव महाजन, साहिल सावंत व ओम भाबड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 122 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या वेंगसकरच्या सलामीवीर यश्वीत साईने 38 धावांची खेळी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली.

तर प्रसन्न पवारच्या 21 धावांनंतर उतरलेल्या ओंकार राजपुतने नाबाद 27, तर, कबीर भट्टचार्जीने नाबाद 11 धावा करत संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला. यावेळी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने केवळ 27.5 षटकांतच 3 गडी गमावत 125 धावांसह सहज विजय मि8ळवत स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली. नाबाद 27 धावा व 20 धावांत 4 गडी बाद करणारा ओंकार राजपुत सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक – साखळी फेरी

कॅडेन्स अकादमी- 28.1 षटकांत सर्वबाद 122 धावा (वेदांत जगदाळे 44, मोहित दहिभाते 24, अनिरूध्द साबळे 20, ओंकार राजपुत 4-20, सक्षम काडलक 3-35, भार्गव महाजन 1-15, साहिल सावंत 1-17, ओम भाबड 1-18) पराभूत वि व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी – 27.5 षटकांत 3 बाद 125 धावा (यश्वीत साई 38, ओंकार राजपुत नाबाद 27, प्रसन्न पवार 21, कबीर भट्टचार्जी नाबाद 11, अर्कम सय्यद 1-20) सामनावीर- ओंकार राजपुत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)