पुजारा आणि कोहलीसारखी खेळी साकारणे गरजेचे – पॅट कमिन्स

मेलबर्न – सामना जिंकायचा अथवा अनिर्णीत राखायचा असल्यास आमच्या फलंदाजांना चेतेश्‍वर पुजारा किंवा विराट कोहली यांच्या खेळी सारखी खेळी साकारणे गरजेचे असल्याचे मत ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मांडले आहे.

यावेळी बोलताना कमिन्सम्हणाला की, आमच्या संघाला पहिल्या डावात जास्त धावा करता आल्या नाही त्यामुळे आम्हाला 292 धावांनी पिछाडीवर रहावे लागले आहे. त्याचा आम्हाला नक्‍कीच तोटा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारण एवढी मोठी आघाडी मोडून काढणे अवघड असते. त्यामुळे आमच्या संघातील फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करताना आपल्या विकेट्‌स राखुन फलंदाजी करायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)