भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घोषीत

सिडनी – भारत आणि दक्षिण अफ्रिके विरुद्ध घोणाऱ्या टी-20 सामन्यांसाठीच्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा संघाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगरयांनीकेली असून या संघातून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि फिरकीपटू नॅथन लॉयनयांना वगळण्यात आले आहे.

भारतीय संघाच्या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ 17 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक टी-20 सामना खेळणार आहे. तर भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, पीटर सीडल आणि मिचेल मार्श यांनाही बाहेर ठेवण्यात आले आहे. तर, मार्कस्‌ स्टॉइनिस आणि जेसन बेहेनडॉर्फ या दोघांनी संघात पुनरागम केले आहे.

तसेच यासंघाचे नेतृत्व ऍरोन फिंच कडे देण्यात आले असून तो आणि ग्लेन मॅक्‍सवेल वगळता इतर खेळाडूंना भारतीय संघाच्या विरोधात खेळण्याचा अनुभव नसल्याने त्यांच्यासाठी आगामी मालिका अवघड असनार आहे. त्यातच ग्लेन मॅक्‍सवेल गेल्या काही सामन्यांपासून अपेक्षित कामगिरी करण्यास अपयशी ठरत असल्याने संघासमोरील चिंता वाढलेली आहे.

संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ : ऍरोन फिंच (कर्णधार), ऍलेक्‍स कॅरी, ऍश्‍टन अगर, जेसन बेहेनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाइल, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्‍सवेल, बेन मॅक्‍डरमॉट, डीआर्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मार्कस्‌ स्टॉइनिस, ऍण्ड्रयू टाय, ऍडम झम्पा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)