#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव

नवीदिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी उमेश यादवची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. यावेळी आपण मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलणार असून या संधीचे नक्‍कीच सोने करेल आणि आगामी विश्‍वचषकासाठी संघात स्थान निश्‍चीत करेल असे वक्तव्य उमेश यादवने केले आहे.

सध्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्‍वर कुमार यांचे स्थान विश्‍वचषक स्पर्धेत पक्‍के मानले जात आहे. तर, सध्या भारताकडे हार्दिक पांड्या हा एकमेव अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहे. अशावेळी पर्यायी गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौल आणि खलिल अहमद यांचा विचार केला जातो आहे.

मात्र, कौल कडे अनुभवाची कमतरता असून खलीलला आपल्या गोलंदाजीतून संघव्यवस्थापनाला खुश करता आलेले नाही. त्यामुळे विश्‍वचषकासाठीच्या संघात आपले स्थान पक्‍के करण्यासाठी उमेश यादवला मिळालेल्या संधीचं सोन करणे गरजेचे बनलेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)