भारत आणि पाकिस्तान सामना होणारच – आयसीसी

दुबई – पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंसहित आजी-माजी पदाधिकारी आणि चाहत्यांनी भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात विश्‍वचषक स्पर्धेत होणारा सामना रद्द करावा अशी मागणी केली होती. मात्र, आयसीसीने यावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, विश्‍वचषक स्पर्धेत ठरल्या प्रमाणे 16 जुन रोजी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सामना होणारच असे स्पष्ट केले आहे.

यावेळी आपली प्रतिक्रिया देताना आयसीसीचे सचिव डेव्ह रिचर्डस म्हणाले की, नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सामने होणार नाहीत, अशी सध्या कोणत्याही सामन्याची स्थिती नाही. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेत सर्व सामने ठरल्याप्रमाणेच होतील. त्यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारा सामना हा अपवाद नसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विश्‍वचषका दरम्यान इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये 16 जूनला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी 25 हजार प्रेक्षकसंख्या असलेले मैदान उपलब्ध आहे. मात्र या सामन्यासाठी तब्बल 4 लाख क्रिकेटप्रेमींचे अर्ज आलेले आहेत, अशी माहितीही आयसीसीने यावेळी दिली आहे.

विश्‍वचषक स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्थी म्हणाले की भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना साखळी फेरीतील सामना आहे. त्याप्रमाणेच साखळी फेरीतील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामनादेखील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा आहे. पण या सामन्यापेक्षाही भारत-पाक सामन्याच्या तिकिटासाठी सुमारे 4 लाख अर्ज आले आहेत. विश्वचषकासंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)