कॅडेन्स अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे  – कॅडेन्स अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा पराभव करत येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे आयोजीत पीवायसी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला कॅडेन्स अकादमी संघाकडून घरच्या मौदानावर पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदा खेळताना अर्शीन कुलकर्णी आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कॅडेन्स अकादमी संघाने 45 षटकात 3 बाद 266 धावांचा डोंगर रचला.

अर्शीन कुलकर्णीने 137 चेंडूत दमदार 134 धावा केल्या. वेदांत जगदाळेने 87 धावा करून अर्शीनला सुरेख साथ दिली. अर्शीन व वेदांत यांनी 231 चेंडूत 191 धावांची दमदार भागीदारी करत संघाचा डाव भक्कम केला. 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्शीन कुलकर्णी व दिग्वीजय पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघ 37.1 षटकात सर्वबाद 140 धावांत गारद झाला.

अर्शीन कुलकर्णी व दिग्वीजय पाटील यांनी प्रत्येकी 2 तर आकाश जाधव, निशांत राजपाठक व वेदांत जगदाळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा अर्शीन कुलकर्णी सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक –

उपान्त्य फेरी – कॅडेन्स अकादमी- 45 षटकांत 3 बाद 266 (अर्शीन कुलकर्णी 134, वेदांत जगदाळे 87, आर्यन गोजे 19, निखिल लुनावत 1-37) वि.वि पीवायसी हिंदू जिमखाना – 37.1 षटकांत सर्वबाद 140 (स्वराज चव्हाण 76, समर्थ काळभोर 14, अर्शीन कुलकर्णी 2-29, दिग्वीजय पाटील 2-33, आकाश जाधव 1-16, निशांत राजपाठक 1-17, वेदांत जगदाळे 1-0) सामनावीर- अर्शीन कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)