ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धा
पुणे – इनव्हेंटीज इंडिया, इक्यू टेक्नॉंलॉजीक या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत विजयी आगेकूच नोंदवली आहे. लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात प्रतीक लवळेकर (50 धावा व 1-18) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इनव्हेंटीज इंडिया संघाने बुऱ्हानिस प्रायव्हेट लिमिटेड संघावर केवळ 1 धावेने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना प्रतीक लवळेकर 50, शंतनु गांधी 26, आनंद कामठे 19 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर इनव्हेंटीज इंडिया संघाने 20 षटकांत 7 बाद 141 धावा केल्या. बुऱ्हानिस प्रायव्हेट लिमिटेडकडून अनिस कचवाला 16-2, अब्देली मोटरवाला 16-2, हुझेफा पूनावाला 21-2, अभिषेक कौशिक 32-2 यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात बुऱ्हानिस प्रायव्हेट लिमिटेड संघाला 20 षटकांत 9 बाद 140 धावा करता आल्या. त्यामुळे केवळ 1 धावेच्या फरकाने इनव्हेंटीज इंडियाने विजय मिळवला. बुऱ्हानिस संघाकडून अभिषेक कौशील 53, अली जेपी 40, मोहम्मद लोखंडवाला 11 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. इनव्हेंटीज इंडियाकडून आनंद कामठे 25-2, प्रतीक लवळेकर 18-1, रोहित शिंदे 20-1, राकेश माळी 32-1 यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत सुरेख गोलंदाजी केली. सामन्याचा मानकरी 50 धावा व एक बळी मिळवनारा प्रतीक लवळेकर ठरला.
दुसऱ्या सामन्यात गौरव पोळेकर 13 धावांत 3 गडी बाद करत केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाने अमेझॉन संघावर 52 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली.
सविस्तर निकाल –
साखळी फेरी –
गट अ: इनव्हेंटीज इंडिया: 20 षटकांत 7 बाद 141 (प्रतीक लवळेकर 50, शंतनु गांधी 26, आनंद कामठे 19, अनिस कचवाला 16-2, अब्देली मोटरवाला 16-2, हुझेफा पूनावाला 21-2, अभिषेक कौशिक 32-2) वि.वि. बुऱ्हानिस प्रायव्हेट लिमिटेड : 20 षटकांत 9 बाद 140 (अभिषेक कौशील 53, अली जेपी 40, मोहम्मद लोखंडवाला 11, आनंद कामठे 25-2, प्रतीक लवळेकर 18-1, रोहित शिंदे 20-1, राकेश माळी 32-1); सामनावीर-प्रतीक लवळेकर
गट ब: इक्यू टेक्नॉंलॉजीक : 20 षटकांत 3 बाद 145 (दर्शन शहा 31, विकास हेमवानी 29, जुनेद सय्यद नाबाद 27, अविनाश केळकर 11) वि.वि. ऍमेझॉन : 20 षटकांत 9बाद 93 (शैजाद फाकीह 22, नरेंद्र देसाई 13, जयंत मिसाळ नाबाद 14, गौरव पोळेकर 13-3, अविनाश केळकर 20-2, गणेश चांगुडे 14-1, दर्शन शहा 15-1). सामनावीर-गौरव पोळेकर
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा