पुणे – आंतर आयटी क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत एफआयएस ग्लोबल, सनगार्ड आणि यार्डी संघांनी विजयी सलामी दिली. एफआयएस ग्लोबल संघाने फिनआयक्यू संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. फिनआयक्यू संघाने 20 षटकात 5 बाद 136 धावा केल्या.
एफआयएस ग्लोबल संघाने हे आव्हान 19.5 षटकात 5 बाद 140 धावा करून पूर्ण केले. यात प्रशांत पोळ याने 53 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी प्रशांत पोळ ठरला.
दुसऱ्या सामन्यात सनगार्ड संघाने ऑलस्टेट सोल्युशन्स संघाचा 15 धावांनी पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. अन्य लढतीत यार्डी संघाने आयडीयाज संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.