सय्यदच्या नाबाद शतकासह अ‍ॅमडॉक्‍स्‌ संघाचा मोठा विजय

15वी अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा

पुणे – अ‍ॅमडॉक्‍स्‌ संघाने यार्डी संघाचा तर सायबेज संघाने टिएटो संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात आवेश सय्यदच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर अ‍ॅमडॉक्‍स्‌ संघाने यार्डी संघाचा 55 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना 6 चौकार व 9 षटकांरासह केवळ 57 चेंडूत आवेश सय्यदने नाबाद 103 धावा केल्या. आवेशच्या शतकी खेळीसह अ‍ॅमडॉक्‍स्‌ संघाने 20 षटकांत 6 बाद 183 धावा केल्या. 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भावनीश कोहली व प्रविण खालखोच्या अचूक गोलंदाजीपुढे यार्डी संघ 18.2 षटकांत सर्वबाद 128 धावांच करु शकला त्यामुळे त्यांना 55 धावांनी पराभुत व्हावा लागला. यावेळी 57 चेंडूत 103 धावांची धडाकेबाज खेळी करणारा आवेश सय्यद सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या लढतीत संकेत ऐकलच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर सायबेज संघाने टिएटो संघाचा 10 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रतिक पंडीतच्या 41, संकेत ऐकलच्या 61 व राकेश शिंदेच्या नाबाद 21 धावांसह सायबेज संघाने 20 षटकांत 6 बाद 140 धावा केल्या. 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निखिल गेरासे व सौरभ रावळ यांच्या आक्रमक गोलंदाजीने टिएटो संघाचा डाव 20 षटकांत 8 बाद 130 धावांत रोखला. यावेळी 61 धावांची खेळी साकारणारा संकेत ऐकल सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल –

साखळी फेरी अ‍ॅमडॉक्‍स्‌ – 20 षटकांत 6 बाद 183 (आवेश सय्यद नाबाद 103, अंकित खरे 21, अविरल जौन 23, प्रभुल पी.के 3-27, प्रमोद दवंडे 2-28) वि.वि यार्डी- 18.2 षटकांत सर्वबाद 128 (स्वप्निल घाटगे 33, गौतम तुळपुळे 25, पंकज लालगुडे 40, भावनीश कोहली 3-21, प्रविण खालखो 3-22).

सायबेज- 20 षटकांत 6 बाद 140 (प्रतिक पंडीत 41, संकेत ऐकल 61, राकेश शिंदे नाबाद 21, पुष्पेंद्र सिंग 3-25, उमेश तोमर 3-15) वि.वि टिएटो- 20 षटकांत 8 बाद 130 (विक्रम माळी 32, चेतन पिंगळे 43, उमेश तोमर 29, निखिल गेरासे 3-21, सौरभ रावळ 2-13).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)