डेक्‍कन जिमखाना, पिल्सनर्स उपांत्य फेरीत

पुणे  -पिल्सनर्स क्रिकेट क्‍लब आणि डेक्‍कन जिमखाना अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत येथे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि पुनित बालन एन्टरटेन्मेंट आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये हर्ष संघवी याने केलेल्या 74 धावांच्या जोरावर डेक्कन जिमखाना अ संघाने भाऊ कोकणे क्‍लबचा 7 गडी आणि 38 चेंडू राखून सहज पराभव केला. भाऊ कोकणे संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 148 धावा जमविल्या. भाऊ कोकणेकडून सागर नाईक याने 61 धावा तर, फैयाझ लांडगे याने 31 धावांचे योगदान देत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. हे आव्हान डेक्कन जिमखाना अ संघाने 13.4 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. हर्ष संघवी याने 35 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 74 धावा फटकावल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)