पुना क्‍लब, सनी इलेव्हन उपांत्य फेरीत दाखल!

पुणे – पुना क्‍लब आणि सनी इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे होत असलेल्या “एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शुभम कोठारी याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनी इलेव्हन संघाने व्हर्च्युअल सिम्युटेक संघाचा 54 धावांनी पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सनी इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 18 षटकात 9 गडी गमावून 164 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये मंदार भंडारी (56 धावा), शुभम हरपाळे (34 धावा) आणि अमित सिंग (31 धावा) यांनी उपयुक्त फलंदाजी करून संघाला 160 धावांचा टप्पा गाठून दिला.

व्हर्च्युअल सिम्युटेक संघाला हे आव्हान पेलवले नाही व संघाचा डाव 15.5 षटकात व 110 धावांवर आटोपला. हृषिकेश मोटकर याच्या 98 धावांच्या तडफदार खेळीच्या जोरावर पुना क्‍लबने शिवनेरी लायन्स्‌ संघाचा 66 धावांनी पराभव केला. पुना क्‍लब संघाने जबरदस्त फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 183 धावांचा डोंगर उभा केला. हृषिकेश मोटकर याने घणघणाती फलंदाजी करताना 63 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांसह 98 धावा चोपल्या.

हृषिकेश याने दुसऱ्या गड्यासाठी अजिंक्‍यच्या साथीत 51 धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर हृषिकेश याने रौनक ढोले-पाटील (31 धावा) याच्यासह तिसऱ्यागड्यासाठी 87 धावा करून संघाला मोठी धावसंख्या रचून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना पीबीइएल शिवनेरी लायन्स्‌ संघाचा डाव 16.3 षटकांत 117 धावांवर संपुष्टात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)