प्रिमिअर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत 20 संघांचा सहभाग

पुणे – ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 16 मार्चपासून दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे होणार आहे.

स्पर्धेत एकूण 20 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये एचडीएफसी, एसएसजी, इन्व्हेंटीज इंडिया, इक्‍यु- टेक्‍नोलॉजीज्‌, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, रिग्रीन, हनीवेल, इबिक्‍स, टेट्रा पॅक, सिसीपी, बुऱ्हाणी प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबकॉम, टीम वन आर्किटेक्‍ट, बीएमएफ, त्रिशा एन्टरप्रायझेस, एसटीईम, टीम हुक, नॉर्थन युनायटेड, टॅलेंटिका आणि फोर्झा लॉजिस्टिक्‍स टेकएब्स या संघांचा समावेश आहे.

-Ads-

स्पर्धेत 4 गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटात 5 संघांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक संघ 4 साखळी सामने खेळणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)